कोल्हापुरचा करारी बाणा….
कुस्तीनं कोल्हापुरची ओळख केवळ देशातच नव्हे तर जगभरात पोहोचवली. नवी पिढी आजही मोठया अभिमानानं हि परंपरा आज पुढं चालवत आहे. कोल्हापुरच्या कुस्तीला नेहमी चांगलेच दिवस राहणार कारण त्यापाठीमागं आहे ते कुस्तीतले भीष्माचार्य आणि कोल्हापुरचा करारी बाणा आपल्या व्यक्तीमत्वात जपणारे आदरणीय बाळ गायकवाड यांचं अमुल्य योगदान.
मैदान गाजवणा-या अनेक मल्लांचे ते वस्ताद होते. वस्ताद या शब्दाची ताकद आणि वजन काय ते त्यांच्यामुळं समजायचं. मागे सत्पाल आणि युवराज पाटील यांच्या लढतीनं इतिहास घडवला. या सत्पालला चारीमुंडया चीत करून ज्या युवराज पाटील यांनी कोल्हापूरचं नाव जगभरात नेलं, त्या युवराज पाटील यांचेही वस्ताद आदरणीय दादा. नुकतंच त्यांचा निधन झालं.
लाल मातीत वाढलेलं आणि घडलेलं हे व्यक्तीमत्व कोल्हापुरचा रांगडा बाणा जपणारं होतं. प्रत्यक्ष मातीतले डावपेच तर महत्वाचे असतातच परंतु कुस्तीत अपडेट राहण्यासाठी वाचनावरही मल्लांनी भर द्यायला हवा, अशी भुमिका ते मांडत. त्यांच्या सान्निध्यात वाढलेले, घडलेले अनेकजण आज त्यांच्या आठवणी हदयात साठवुन आहेत. आदरणीय दादा म्हणजे कोल्हापुरच्या कुस्तीपर्वाचं एक सोनेरी पानंच.
म्हणुनच हे व्यक्तीमत्व या पुढच्या अनेक पिढयांना प्रेरणादायी ठरणार आहे. त्यासाठी त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक आठवण कायमस्वरूपी कशी जपली जाईल, साठी एकत्रित प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.