जनाचं नाही, आता मनाचंच ऐका !
ऐकावं जनाचं, करावं मनाचं, अशी एक म्हण आपण नेहमी एकमेकांना सांगत असतो. परंतु आता मनाचंच ऐकावं लागणार आहे कारण आपल्या मनाचा थेट कॉम्प्युटरशी संबंध जोडला जातोय. यासंदर्भातलं संशोधन नुकतंच सुरू झालंय.
एलॉन मस्क यांची स्टार्टअप कंपनी ‘न्यूरालिंक’नं मानवी मेंदूत ऑपरेशन करून चीप बसवलीय. त्यामुळं आता केवळ मेंदूतल्या विचारांतुन आपण संगणकावर नियंत्रण ठेवू शकता.
एका छोटया नाण्याच्या आकाराची ही चीप आहे. कंपनीनं या पहिल्या उपकरणाचं नाव ‘टेलीपथी’ असं ठेवलंय. हा प्रयोग यशस्वी झाला तर खुप क्रांतीकारक असे बदल दिसुन येतील. या माध्यमातुन दृष्टी नसलेल्यांनाही सृष्टी पाहता येईल.
इतकेच नव्हे तर पॅरालिसीसचे रूग्णही चालु, फिरू शकतील आणि संगणकही हाताळतील. प्रत्यारोपणानंतर त्याचा अभ्यास करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर त्याचे रिझल्ट जगासमोर येतील