दररोज दीड टनाचा पसारा…आवरा ई कचरा !
तसं पाहिलं तर कोणत्याही वस्तुचा परत परत वापर करण्यात कोल्हापुरकर खुपच हुशार आहेत. टाकावु मटेरियलमधुन टिकावु आणि समाजोपयोगी साधनांचे शोध याच भुमीत लावण्यात आले आहेत. त्याच्या बातम्याही आपण वारंवार वाचतो. मात्र इतके सारे असुनही आज ई कच-याची समस्या गंभीर बनत आहे. आकडा ऐकुन थक्क व्हाल, कारण कोल्हापुर जिल्हयात दररोज सुमारे दीड अन ई कचरा तयार होतोय.
सर्वांत धक्कादायक आणि घातक बाब म्हणजे हा कचरा स्वतंत्रपणे टाकण्याची कोणतीच सुविधा नसल्यामुळं जनावरांच्या पोटात हा कचरा जाण्याचं प्रमाण वाढू लागलंय. उपलब्ध माहितीनुसार कोल्हापुर जिल्हयात दररोज शंभर ते सव्वाशे जनावरांच्या पोटावर शस्त्रक्रीया करण्यात येते. तर त्यातल्या दोन ते पाच जनावरांच्या पोटात तांब्याच्या तारा किंवा इलेक्टॉनिक वस्तुंचे सुटे भाग आढळतात.
यापुढची माहिती तर अधिक धक्कादायक आहे. दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, रोज कच-यात पडणा-या मोबाईलची संख्या ही 2000 इतकी आहे. रोजचे कच-यात जाणारे टीव्ही 400, कॉम्प्युटर स्क्रीन 300 अशी आकडेवारी आहे.
इलेक्टॉनिक्स वस्तु दुरूस्त करणा-या एका दुकानात साधारण दररोज 2 किलो ई वेस्टेज तयार होते. अशी किमान 700 दुकाने आहेत. विशेष म्हणजे हॉस्पीटलचा कचरा गोळा करण्यासाठी किंवा साठवण्यासाठी वेगळी यंत्रणा असते, तशी कोणतीच यंत्रणा सध्या ई कच-याबाबत उपलब्ध नाही. विषय हार्ड हाय हे नक्की.