…तर पुढची शिकार तुम्ही असाल !

हल्ली राजकारणात दररोज होणारे अत्यंत खालच्या स्तरावरचे आरोप प्रत्यारोप पाहता हे काही राजकारणी कुत्र्यासारखे एकमेकांवर का भुंकतात, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. असाच प्रश्न प्रत्यक्षात कुत्र्यानाही का पडु नये? तो तर त्यांचा कॉपीराईट आहे ना? कदाचित यामुळंच कोल्हापुरात भटक्या कुत्र्यानी आपली दहशत माजवली असेल.

उपलब्ध माहितीनुसार कोल्हापुरात दररोज वीसहुन अधिक जणांना भटकी कुत्री चावतात. इतकंच नव्हे तर सीपीआरचं अर्ध बजेट रेबीज व्हॅक्सीनवरच जातंय. दरवर्षी श्वानदंश झालेले तब्बल चार हजार रूग्ण सीपीआरमध्ये उपचार घेत असल्याची नोंद आहे. नागरिकांनीही दक्षता घ्यावी, नाहीतर कदाचित पुढची शिकार तुम्ही असाल.

कायद्यानुसार भटक्या कुत्र्याना मारताही येत नाही आणि जंगलातही सोडता येत नाही. त्यामुळं ही एक नवी समस्या अत्यंत उग्र रूप धारण करत आहे. रात्री अपरात्री कामावरून परतणारे तर जीव मुठीत घेवूनच जात असतात.

सध्या डॉग कॅचर 12 आहेत तर एकुण पिंज-यांची संख्या आहे 95. दोन केंद्रात तब्बल 7000 हुन अधिक श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात आलंय, मात्र आणखी एक वाहन खरेदी केल्यास ही गती वाढेल, असं अधिका-यांचं म्हणणं आहे. त्या दृष्टीकोनातुन तातडीनं पावलं उचलण्याची गरज आता निर्माण झालीय, हे खरं.

Related Articles

Back to top button